प्रतिनिधी , सोलापूर : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचा यंदाचा गुरुप्रतिपदेचा सोहळा भक्तांविना साजरा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर खुलून गेला आहे.
स्वामींचे पुणे येथील भाविक वासुदेव पंडित यांनी ही फुलांची सजावट केली आहे. गुरुप्रतिपदा सोहळा प्रत्येकवर्षी मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या सहभागात साजरा होतो. मात्र, यंदा हा सोहळा निवडक पुजारी, मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.
गुरुप्रतिपदेच्या सोहळ्याला स्वामीभक्तांना जरी उपस्थित राहता येणार नसलं तरी स्वामींचे मंदिर हे खुलचं असणार असल्याची माहिती वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली आहे.
