जनतेज न्युज

केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघात रस्त्यांची दयनीय अवस्था…

प्रतिनिधी , जालना जिल्हा हा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मतदार संघ आहे या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोक खराब रस्त्यांमुळे त्रस्त आहे, या मुळे ग्रामीण भागातील बस वाहतूक सुधा बऱ्याच वर्षांपासून बंद आहे, याचे कारण आहे मुख्य रोड वर पडलेले खड्डे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही या खराब रस्त्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात होत आहे तरी स्थानिक पुढारी व बांधकाम विभाग या खराब रस्त्यांकडे डोळे झाक करत आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे धावडा ते पिंपळगाव रोड या रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालक व प्रवाशी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या मुळे परिसरातील गावकरी मंडळी स्थानिक लोक सेवकांना जबाबदार धरले आहे, त्या मुळे यांनी लवकरात लवकर या रोडची दुरस्थी करावी आशी मागणी गावकरी मंडळी करत आहे.