जनतेज न्युज

काँग्रेसचे आज भारत बंद आंदोलन

नवी मुंबई – केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात काँग्रेसतर्फे आज, २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात सर्व उत्स्फूर्तपणे सहभागी होते.

शेतकऱ्यांना आणि कामगारांना नेस्तनाबूत करणारे कायदे केंद्र सरकारने आणले. देशात बेरोजगारी वाढत असून, तरुण देशोधडीला लागला आहे. तसेच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम महागाई निर्माण केली आहे. केंद्र सरकारने या हुकूमशाहीने शेतकरीविरोधी तीन काळे कायदे आणले. त्या विरोधात नेरुळ येथे आंदोलन करण्यात आलं होतं.