जनतेज न्युज

केंद्रीय मंत्र्यांच्या घरी दिवाळी करणार साजरी…

11नोव्हेंबर पासुन विदर्भात स्वाभिमानीचे आंदोलन…

प्रतिनिधी , अतिवृष्टीमुळे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 11 नोव्हेंबर पासुन केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून त्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करणार असल्याचे घोषणा करण्यात आली आहे.
व्हिओ – महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी. केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांना भरघोस असं पॅकेज जाहीर करावं. हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ मदत द्यावी या मागण्यासाठी महाराष्ट्रातील केंद्रामध्ये मंत्री आहेत. प्रमुख्याने संजय धोत्रे ,नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन व दिवाळी साजरा करणार असल्याचे स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे .