जनतेज न्युज

पीक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांची लूट; खा. भावना गवळी यांचा आरोप

प्रतिनिधी , यवतमाळ : पिकाची सुरक्षा करण्यासाठी शेतकऱ्यांना पीकविमा काढला. परंतु, आता शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पीक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांची लूट होऊ देणार नाही, असा इशारा खा. भावना गवळी यांनी दिला.
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख 67 हजार शेतकरी संख्या आहे. शेतकऱ्यांनी 35 कोटी रुपये मोजून पीक विमा काढला. आता पीकविम्यासाठी केवळ आठ हजार शेतकरी पात्र ठरले आहे. पीक विमा कंपन्यानी शेतकऱ्यांची लूट केली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कटिबद्ध आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खा. भावना गवळी यांनी दिला आहे.