जनतेज न्युज

केंद्र सरकारच्या महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन,पेट्रोलमध्ये दररोज 80 पैशाने वाढ

प्रथिनिधी, बुलढाणा : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅंस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ करुन , महागाईत वाढवत सामान्य जनतेची लुट करीत असल्याचा आरोप करीत आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. मागिल पाच दिवसात पेट्रोल, डिझेल मध्ये दररोज 80 पैशाने वाढवत 3.20 रूपयाची वाढ केली तर एलपीजी गॅंस सिलेंडर 50 रूपयाने महाग केला असुन तो आता काही ठिकाणी 1 हजार रूपयाच्या वर गेला आहे. यासोबतच PNG आणी CNG गॅंसही महाग केला आहे. तसेच खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरातही मोठया प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगने मुश्किल झाले आहे. तसेच इंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, सर्वसामान्य जनतेची खुलेआम लुट सुरू आहे, पण केंद्रातील  सरकार मात्र डोळेझाकुन बसले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून होत आहे. आज शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठवुन केंद्र सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘महागाई मुक्त भारत’अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात सकाळी गॅंस सिलेंडर, स्कुटर, मोटर सायकलला सजवुन केंद्र सरकारच्या महागाई विरोधात टाळ/मृदुंग व ढोल वाजवत घोषणाबाजी करण्यात आली.