जनतेज न्युज

केतकी चितळेच्या प्रतिमेवर मद्य ओतून राष्ट्रवादी ने केला निषेध

प्रतिनिधी, बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमकच आहेत. राष्ट्रवादी नेते बाळासाहेब मस्के यांच्या नेतृत्वात बीड आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या गोदावरी नदी पात्रात आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इथे आंदोलन करण्यात आले. यावेळी केतकी चितळे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केतकीला अटक झाली असली तरी तिने पवार यांची सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलीय. या गोदावरी नदी पात्रात पंचक्रोशीतील ग्रामस्थ दहावा घालण्यासाठी येत असतात आणि याच ठिकाणी पुन्हा केतकी तिच्या फोटोवर मद्य ओतून निषेध नोंदविण्यात आला आहे.