जनतेज न्युज

उड्डाण पुलाच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पुर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी

प्रतिनिधी, मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) उड्डाण पुलाच्या विभिन्न भागांतील दुरुस्तीचे  काम 13 ते 24 मे दरम्यान केले जात आहे.त्यामुळे 10 दिवस हा  पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे या पुलाखालून वाहतूक वळविण्यात आली आली आहे रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. पण, या काळात उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरु राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी मिळून हा उड्डाणपूल बांधला आहे. वाहतुकीसाठी चांगला पर्याय असलेल्या या उड्डान पुलाची डागडुगी करण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी ही प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.त्यामुळे याचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. 24 मे पर्यंत वाहतूक कोंडीची समस्या ही प्रवाश्यांना होणार आहे. त्यामुळे प्रवाश्यानी याचा अंदाज घेऊनच प्रवास करावा