प्रतिनिधी, बीड : आज बुद्ध पौर्णिमा आणि याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. जगभरात बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात होत असताना बीडच्या गेवराई येथील सिद्धेश्वर महाविद्यालयातील कला शिक्षक नवनाथ सांगुळे यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून गौतम बुद्धांची प्रतिमा रेखाटली आहे. ही प्रतिमा सादर करण्यासाठी त्यांना तब्बल साडे सहा तास लागले आहेत. ही अप्रतिम प्रतिमा लक्ष वेधून घेत आहे
