प्रतिनिधी, नाशिक : येवला शहरात भगवान गौतम बुद्ध यांच्या 2566 वी जयंतीनिमित्त गंगादरवाजा ते मुक्तीभुमी पर्यंत भव्य अशी रथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुक्तीभूमी येथे येऊन भगवान गौतम बुद्धांच्या 30 फूट असलेल्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र सह देशभरातून अनुयायी मुक्तीभूमी येथे अभिवादनसाठी येत असतात. मुक्तीभूमी येथे विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते.
