जनतेज न्युज

केळीत आंतरपीक म्हणून कलिंगडांचे लागवड केल्याने येणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी समाधान

प्रतिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यातील माचला येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी डिसेंबर महिन्यात साडेतीन एकरात केळीची लागवड केली या एका पिकावर अवलंबून न राहता त्यांनी डिसेंबर एंडिंगला मल्चिंग पेपरवर कलिंगडाची लागवड केली आता कलिंगड तयार झाल्याने काढणे सुरू आहे. कलिंगडाला योग्य भाव मिळाला असल्याने शेतकऱ्याला यापासून संपूर्ण खर्च वजा जाता समाधानकारक उत्पन्न मिळणार आहे. केळीत आंतरपीक कलिंगड हे उत्तम पिक असून यापासून केळी पिकाला फायदा होतो शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती न करता योग्य नियोजन करून केळीत आंतरपीक घेतले तर शेतकऱ्यांना त्यापासून चांगला फायदा मिळतो असे तरुण शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.

निसर्ग आपल्या हातात नाही व भाव देखील आपल्या हातात नाही त्यामुळे आंतरपिकातून दुय्यम नफा मिळाला . कमी दिवसात शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसा कसा येईल. केळी मध्ये आंतरपीक म्हणून कलिंगड ची लागवड करणे ही काळाची गरज आहे. आंतरपिकाची जोड देऊन शेती केली तर शेती समृद्ध होईल व शेतकरी हि समृद्ध होईल आणि शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतील बदलत्या वेळेनुसार उत्पादन खर्च कसा कमी करता येईल असा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रगतिशील मार्गदर्शक शेतकरी डॉक्टर रविंद्र निकम यांनी सांगितले.