जनतेज न्युज

दहावीची ऑफलाईन परीक्षा आजपासून सुरळीतपणे सुरू

प्रतिनिधी, जळगाव : दहावीची बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे ,पहिला पेपर हा मराठी असून सुरळीतपणे परीक्षेला सुरुवात झाली आहे, ऑनलाइन ऑफलाईन शिक्षण घेऊन विद्यार्थी आता ऑफलाईन पद्धतीने दहावीची परीक्षा देत आहेत. कोरोना च्या वाढत्या महामारी मुळे गेल्यावर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली होती, त्यानंतर ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत होते ,या वर्षी कोरोनाची रुग्ण संख्या घटल्यामुळे दहावीची बोर्डाची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे, आज पासून दहावीची परीक्षेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना हातावरती सॅनिटायझर देऊन व विद्यार्थ्यांचे टेंपरेचर चेक करून परीक्षेसाठी वर्गामध्ये सोडण्यात आली असल्याची माहिती परीक्षा केंद्राचे उपकेंद्र संचालक कुलकर्णी मॅडम यांनी दिली आहे.