प्रतिनिधी , औरंगाबाद : आज मंगळवार 14 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की,औरंगाबाद लाचलुचपत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून यामध्ये क्लास वन अधिकारी यांच्यासह लास्ट अधिकारी यांना लाच घेताना पकडण्यात आले असून भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी लाचलुचपत विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना दिली आहे, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी नागरिकांना आज रोजी केली आहे.
