जनतेज न्युज

रहदारीला मोठे अडथळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नागरे यांनी उठवली टिकेची झोड

प्रतिनिधी , औरंगाबाद :  जिल्ह्यातील शेवगाव शहरांमध्ये झालेल्या पहिल्याच पावसामुळे शेवगाव शहरामध्ये ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे, त्यामुळे रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहेत. यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नागरे यांनी टिके ची झोड उठवली. टक्केवारीच्या राजकारणात गुंतलेल्या पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत शेवगावला विकासाची कोणतीही दिशा दिली नाही. उलट यामुळे शेवगावच्या जनतेची निराशा झाली आहे. टक्केवारी मध्ये गुंतलेल्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय येथे निवडणूकीत राहणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.