प्रतिनिधी, नागपूर :
गेली सहा महिने शिवसेनेने नागपूर आणि विदर्भात लक्ष केंद्रित केले आहे.गेले चार महिने प्रत्येक महिन्यात एकदा मी नागपुरात येत आहे.
- सध्या विद्यापीठ सिनेट निवडणुकीची नोंदणी सुरु आहे.आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे शिवसेना नागपूर विद्यापीठाची सिनेट निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार आहे..
- त्यासाठी चांगली नोंदणी युवासेनेने केलेली आहे.अनेक सिनेट सदस्य युवा सेनेचे संपर्कात आहेत. येणाऱ्या दिवसात ते युवासेना सोबत येतील.
ऑन महापालिका –
- युवा सेनेचा असा कुठलाही कोटा निर्धारित नाही. मात्र जर युवासेनेचा कोणी पदाधिकारी चांगला काम करत असेल तर नक्कीच त्याला महापालिका निवडणुकीसाठी संधी मिळू शकेल.
ऑन मुख्यमंत्री सभा –
- काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीनगर या ठिकाणी अतिविराट सभा झाली. विरोधकांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर उद्धव जी ने दिले.
- गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडणारी ती सभा होती.
- येणाऱ्या काळात नागपूरमध्ये ही उद्धव जी येतील तेव्हा गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडणारी अशीच अतिविराट सभा होईल.
ऑन नितेश राणे ट्विट
- कोण काय म्हणत आहे. काय ट्विट करत आहे.याला महत्व नाही. सर्व प्रसारमाध्यमांनी उद्धवजींची विराट सभा लाइव्ह दाखवली.लाखो लोक या सभेत उपस्थित होते.
- फक्त 25 टक्केच शिवसैनिक त्या मैदानात पोहोचू शकल. उर्वरित सर्व बाहेरच सभा ऐकत होते.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाषणातच औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरण करण्याबद्दल बद्दल सांगितलेले आहे आणि त्यादृष्टीने पावलेही उचलली जात आहे.
