प्रतिनिधी , कोरोना काळात मागील वर्षी अमरावती जिल्ह्यातील रामा या गावातील अंगणवाडी सेविका उषाताई पुंड यांना आपले कर्तव्य बजावत असताना कोणाची लागण झाल्याने त्यांचे त्यावेळी निधन झाले.त्यामुळे शासनाच्या वतीने कोविड योद्धा दिवंगत अंगणवाडी सेविका उषाताई पुंड यांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांची मदत जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना धनादेशाद्वारे देण्यात आला.यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी पुंड कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना दिलासा दिला.कोरोना विरुद्धच्या लढाईत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोठे आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून गत एक वर्षांपासून लढवय्या वृत्तीने सेविका कार्यरत आहेत. याच लढाईत शहीद झालेल्या उषाताई पुंड यांचे देशासाठी व समाजासाठीचे योगदान अमूल्य आहे. शासन कोरोना लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले
