प्रतिनिधी , दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील स्नेहा अँटिबायोटिक या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीच्या आवारातील गवताला अचानक आग लागल्याची घटना घडलीय, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळलाय..मागील अनेक वर्षांपासून कुरकुंभ एमआयडीसी मधील ही कंपनी बंद आहे,सध्या उन्हाळा असल्याने या ठिकाणी गवत आणि झाडांचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पसरला आहे,गवत आणि पालापाचोळ्याला आग लागल्याने ही आग पसरली गेली,मात्र घटनेची माहीती मिळताच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमनच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली,यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला…
