जनतेज न्युज

पारंपारीक पेरणी पद्धतीला फाटा देत कुसब्यांचे शेतकऱ्यांने घेतले 4 एकरात 50 क्विंटल हरभराचे उत्पन्न

प्रतिनिधी , जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथील प्रगतिशील शेतकरी यांनी पारंपारिक पद्धतीचे पेरणी न करता तसेच सेंद्रिय खताचा वापर करून रासायनिक खताचे कमीत कमी वापर केल्याने चार एकरामध्ये हरभरा चे उत्पन्न या वर्षी 50 क्विंटल अपेक्षित असल्याच्या प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी विश्वास दर्शविला

कुसुंबें, ता. चोपडा, जि.जळगाव येथील प्रगतिशील शेतकरी, श्री. ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील, यांचे एकूण क्षेत्र हे २१ एकर असून मुख्य पीक हे केळी आहे. केळी पिकाची काढणी केल्यानंतर पीक फेरपालट साठी रब्बी हंगामात हरबरा, गहू, ज्वारी, बाजरी पिकांची लागवड केली जाते. तसेच खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तीळ, उडीद, मूग या पिकांची लागवड केली जाते. मुख्यत्वेकरून रब्बी हंगामात हरभरा या पिकाची लागवड केली जाते कारण हरभरा हे पिक द्विदल वर्गीय गटात मोडत असल्यामुळे हवेतील नत्र स्थिरीकरणा साठी त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. या वर्षी श्री. पाटील यांनी पीकेव्ही-२, पीकेव्ही-४ (काबुली) आणि गुडलक या वाणांची बैलजोडीने ११ एकर क्षेत्रांत रायझोबियम या जिवाणूसंवर्धकाचा सहाय्याने बियाणे प्रक्रिया करून पेरणी केली आहे, त्यात नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणजे त्यांनी पारंपरिक पिक पेरणीतील अंतराला फाटा देत दोन झाडातील अंतर हे २१ इंच ठेवले आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे सुक्ष्म सिंचनाच्या साह्याने केले आहे. दोन झाडांमधील अंतर जास्त असल्यामुळे पुरेसे हवा मिळून फुलांच्या संख्येत वाढ झाली परिणामी प्रती झाड घाटे जास्त लागतात.
रासायनिक खतांचा संतुलित वापर करून दरवर्षी एप्रिल महिन्यात एकरी तीन ते चार ट्रेलर शेणखताचा वापर शेतामध्ये केला जातो. त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत असून, त्याचा फायदा हा जमिनीतील पाणी धरुन ठेवण्यास होत आहे.