जनतेज न्युज

धुळ्यात जनता कर्फ्यु ला उत्सपूर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी , धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना बाधित तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या आदेशाने रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. या जनता कर्फ्यू ला आज म्हणजेच रविवारी सायंकाळपासून सुरुवात झाली असून व्यवसायिकांनी उस्फूर्तपणे पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आहे.

व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली, यामुळे रविवारी सायंकाळी गजबजणारा मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड सायंकाळी सहा वाजेपासून निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य तरी जनता कर्फ्यू मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे तसेच या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.