जनतेज न्युज

कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद हवालदार संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद हवालदार संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू मधील राजुरी भागात दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात करवीर तालुक्यातील निगवे खालसा या गावातील 37 वर्षे जवान हवालदार संग्राम पाटील हे शहीद झाले होते त्यानंतर आज त्यांचं पार्थिव गावात आल्यावर गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली तर गावातल्या हायस्कूलच्या मैदानावर त्यांना sasrhru नयनांनी निरोप देण्यात आला संग्राम पाटील यांना निरोप देण्यासाठी हजारो नागरिक आज मैदानावर उपस्थित होते यांच्या आठ वर्षीय मुलाने त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई-वडील असा परिवार आहे दरम्यान गेल्या आठवड्यात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील शहीद झालेला जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली