जनतेज न्युज

भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीज बिलाची होळी

आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला सरकारचा निषेध

प्रतिनिधी , सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वीज बिलात सवलत देण्यासाठी भाजपच्या वतीने आज आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे महावितरण कार्यलय समोर वीज बिलाची होळी करण्यात आली.

आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडीचा निषेध करून जास्त प्रमाणात आलेल्या वीज बिलाची होळी करण्यात आलीय.राज्य सरकारने लवकरात लवकर वीज बिले माफ करावीत अशी मागणी करत यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या.यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.