जनतेज न्युज

कोविडसंदर्भात राज्यात ६ लाख ११ हजार व्यक्ती क्वारंटाईन

एक लाख ३८ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ५२ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

प्रतिनिधी, मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ५२ लाख ५२ हजार ६६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख ११ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Maha Info Corona Website

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ३१ हजार २८६ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २९ जून या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २९० (८६० व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०५ हजार १९३

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख १२ हजार ८५१.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८५ हजार ७८०.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५९

(मुंबईतील ३७ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे २, ठाणे ग्रामीण २ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना १ अधिकारी, उस्मानाबाद-१)

कोरोना बाधित पोलीस – १२८ पोलीस अधिकारी व ९७५ पोलीस कर्मचारी

राज्यातील एकूण रिलिफ कँप – १० (१०४ लोकांची व्यवस्था)