प्रतिनिधी, मुंबई : भारतात आज ३० जून रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५६, ०६,८४० आहे. १६,८९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत नवे रुग्ण १८,५२२ आढळले असून गेल्या २४ तासांत ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा १,६९,८८३ रुग्ण, गेल्या २४ तासांत ५२५७ नवे रुग्ण, एकूण मृत्यू ७६१० आणि गेल्या २४ तासांत ७८ मृत्यू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.
कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर जगात ४.९९, भारतात २.९८ आणि महाराष्ट्रात ४.४८ टक्के आहे. दरम्यान, जगात रुग्णांची संख्या १,००,२१,४०१ झाली आहे. एकूण ४,९९,९१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ४,१५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे व नवे १७,०८,३२८ रुग्ण आढळले आहेत.
ही आकडेवारी अनालिटिक्स मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने तयार केली आहे. याचा डेटा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने संकलित केला आहे. आकडेवारी ३० जूनच्या सकाळी १० वाजेपर्यंतची आहे.
