प्रतिनिधी , कोविड पॅनडेमिकच्या महामारीमध्ये पालकांच्या नोकऱ्या गेल्या असताना, पगार कपात झाली असताना शाळा प्रशासन फी भरण्यास सक्ती करीत आहे, ऑनलाईन प्रक्षिषणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे, विद्यार्थ्यांना मार्कशीट देण्यात येत नाही, विद्यार्थ्यांनकडून ऑनलाईन असताना फी संदर्भात मागणी केली जाते अशा शाळेच्या मनमानी कारभारा विरोधात, फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या रायन संकुल, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व येथे शालेय प्राशासना विरोधात मनसेचे सरचिटणीस नयनजी कदम यांच्या नेतृत्वात आंदोलन..ह्या आंदोलनात हेमंत कांबळे विभाग अध्यक्ष मनसे कांदिवली विधानसभा, मिलिंद (बंटी) घाग विभाग अध्यक्ष मनविसे मागाठाणे विधानसभा, दिनेश साळवी विभाग अध्यक्ष मनसे चारकोप विधानसभा, कुणाल माईनकर उपविभाग अध्यक्ष, मनीष पुजारे वॉर्ड अध्यक्ष मनविसे वॉर्ड ३ तसेच मनसेचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते व पालक उपस्थित होते
