जनतेज न्युज

भुसावळच्या माजी नगराध्यक्ष याचा हॉटेलमध्ये राडा, पिस्टल काढले बाहेर ,गुन्हा दाखल.

प्रतिनिधी , जळगाव : जळगाव शहर नजीक असलेल्या खेडी शिवारात एका हॉटेलमध्ये 13 डिसेंबर रोजी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी व जळगाव चे नगरसेवक सुनील माळी यांचे बंधू मुकेश माळी या दोन गटात किरकोळ वादातून राडा झाला. यात अनिल चौधरी यांच्या समर्थकाने पिस्तूल काढल्याने तणाव निर्माण झाला होता. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी , भगत बालानि यांचा सह 10 जणांवर एमायडिसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव कडून भुसावळ कडे जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या न्यू महेंद्र ढाबा येथे 13 डिसेंबरच्या रात्री साडेदहाच्या सुमारास भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी व व जळगाव येथील मुकेश दत्तात्रय माळी या दोघांच्या समर्थकांमध्ये जेवणानंतर झालेल्या वादातून जोरदार राडा झाला . याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली.
या घटनेत सदर धाब्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास जळगाव चे नगरसेवक सुनील माळी यांचे बंधू मुकेश दत्तात्रय माळी हे त्यांच्या तीन-चार मित्रांसोबत जेवणासाठी आले होते. काही वेळात भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी जळगाव येथील भगत बालाणी यांच्यासह 5 जण जेवणासाठी आले होते. जेवण आटोपल्यावर अनिल चौधरी यांनी खुर्चीला लाथ मारल्याने मुकेश माळी व अनिल चौधरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. दोघेही जण एकमेकांवर धावल्याने अनिल चौधरी यांच्या सोबत आलेल्या इसमाने आपल्या जवळची रिवाल्वर काढल्याने याठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी , भगत बालानि यांचा सह 10 जणांवर दंगा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल चौधरी हे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली आहे