जनतेज न्युज

कोविड लस घेण्यासाठी डॉक्टरांचा चांगला पुढाकार मिळत असल्याचे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या.

प्रतिनिधी , आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे जास्त सर्वे करतात ते जास्त लोकांच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांनी कोविड लस घेतलीच पाहिजे स्वतः साठी कुटुंबाच्या सुरक्षासाठी ही लस महत्त्वाची असल्याची मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या.
16 जानेवारीपासून संपूर्ण भारतात कोविड लसची सुरुवात झाली असून औरंगाबाद शहरात ही कोविड लस ची सुरुवात झाली आहे आतापर्यंत एक हजार च्या आसपास ही लस दिली गेली असल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या.
कोविड लस आठवड्यातून चार दिवस दिली जाते यामध्ये डॉक्टरांचा चांगलाच पुढाकार दिसून येतो अशा सेवकांचा ही चांगला प्रतिसाद आहे परंतु एक दोघींनी ही लस घेण्यास नकार दिला होता परंतु त्यांची कौन्सिलिंग करून त्यांची शंका दूर करून ते घेणार असल्याचे डॉ.नीता पाडळकर म्हणाल्या.