प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथे शेतकऱ्यांना बोगस खते विक्री प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही तर यामध्ये
मोठे रॅकेट उघडकीस येईल यात शंका नाही.बोगस खत विक्री प्रकरण चर्चेत असतांना आता कपाशीचे बियाणे सुध्दा बोगस विक्री केल्याचे येथील शेतकरी परशुराम कौतीक पाटील यांनी सांगितले आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून कपाशीचे बोगस बियाणांचा फटका या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तीन महिने उलटूनही कपाशीच्या पिकांचे उत्पादनात मोठी घट झाली असून कपाशीचे बोंडे देखील बारीक बारीक लागलेली पाहुन मंजुर वर्ग देखील बारीक बारीक लागलेली कपाशीचे बोंडे काढण्यासाठी नकार देत होते.सुमारे तीन एकर मध्ये तीन पाकिटे कपाशीची लागवड केली होती या तीन एकर क्षेत्रात फक्त आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळाले आहे.कपाशीचे बोगस बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांची तीन महिन्याची मेहनत वाया गेली आहे. शासनाने या संदर्भात लक्ष घालावे आणी बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रावर व कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी परशुराम कौतीक पाटील यांनी कसबटाईने करित असलेल्या तीन एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली होती परंतु शेतकऱ्याला कपाशीचे बोगस बियाणांचा फटका बसल्याची घटना समोर येत आहे.
खडकदेवळा येथील शेतकऱ्याला कपाशीच्या बोगस बियाणांचा फटका,तीन एकरतील कपाशी पिकाला बसला असुन हे तीन एकर क्षेत्रातील कपाशीचे पीक उपटण्याची वेळ येथील शेतकरी यांच्यावर आली आहे.
तीन महिने उलटूनही कपाशी पिकाला चांगले बोंडे न लागल्याने, या तीन एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केलेल्या शेतातील उभे कपाशीचे पिक काढून टाकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा संकटात आला आहे. लागवडीसह बियाणे,खते, औषधी,आदी खर्च देखील निघाला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तरी संबंधित प्रकरणांची चौकशी केल्यास मोठे रॅकेट बोगस बियाणे विक्री चे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी परशुराम कौतीक पाटील यांनी कसबटाईने करित असलेल्या तीन एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली होती परंतु प्रत्यक्षात तीन महिने झाले तरी या कपाशीच्या पिकांवर औषधी फवारणी,खते देवुनही बोंडे चांगल्या प्रतीचे तयार होत नव्हते तसेच लागलेली कपाशीचे बोंडे देखील बारीक बारीक लागलेली असल्याने मंजुर वर्ग देखील या कपाशीच्या वेचणी करण्यासाठी नकार देत होते त्यामुळे शेतकरी हातबल झाले होते.तब्बल तीन एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली होती परंतु प्रत्यक्षात तीन एकर क्षेत्रात कपाशीचे उत्पादन फक्त आठ ते दहा क्विंटल निघाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे बि बियाणे, महागड्या औषधांची फवारणी, खते, शेती मशागतीचा खर्च देखील निघाला नसल्यामुळे शेतकरी परशुराम कौतीक पाटील यांनी तब्बल तीन एकर क्षेत्रातील कपाशीचे पीकात गावातील गुरें ढोरे सोडून ती कपाशीचे पीक काढण्याचा निर्णय घेतला.
