जनतेज न्युज

खारघर मध्ये तरुणावर गोळीबार

प्रतिनिधी , नवी मुंबई : पेण येथून वाशीमध्ये फिरण्यासाठी आलेल्या तरुणावर खारघरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी लुटण्याच्या उद्देशाने तरुणावर अशा प्रकारे हल्ला करण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे.
प्रतीक रवींद्र आहेर (24) नावाचा पेणमध्ये राहणारा व्यक्ती रात्री ११च्या दरम्यान वाशी येथून सायन-पनवेल-हायवेने पनवेलकडे जाताना कोपरी गाव बस स्टॉपच्या मागील रोडने आत मध्ये जाऊन सिगरेट घेऊन तो पीत असताना त्या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे मोबाईल पैसे व दुचाकीची चावी मागू लागल्याने ते देण्यास त्याने नकार दिल्याने, त्या पैकी एक जण जबरदस्तीने प्रतीकचा मोबाईल ओढु लागला, त्याला विरोध केल्याने प्रतीक आहेर यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर गोळी फायर करून ते तिघेही पळून गेले.
त्याला उपचारासाठी सिटी हॉस्पिटल खारघर सेक्टर 7 येथे नेण्यात आले आहे. सध्या एमजीएम कामोठे हॉस्पिटल येथे संबंधित तरुण उपचार घेत आहे.या गुन्ह्याचा तपास खारघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी हे करीत आहेत.