प्रतिनिधी , सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील देववाडी येथील महिलेवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी कॅडल मार्च काढला. गावातीलच धनाजी खोत या २२ वर्षीय तरुणाने या महिलेचा बलात्कार करून तिला विहिरीत फेकून दिल्याची घटना काल समोर आली होती. या घटनेपासून आरोपी विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज देववाडी गावातील महिला, मुले-मुली पुरुष मंडळींनी एकत्र येत या आरोपीस फाशी दयावी अशी मागणी करत गावातून कॅडल मार्च काढला. तसेच मृत महिलेला श्रद्धांजली वाहिली.
