प्रतिनिधी , पंढरपूर : राज्यात मोठ्या प्रमाणात मका उत्पादित झाल्याने केंद्र शासनाने राज्यास 10 लाख क्विंटल मका खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शासनाने 4 लाख 90 हजार क्विंटल मका खरेदी
करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार असल्याने शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यंदा राज्यात चांगला पाऊस पडल्याने शेतकर्यांनी मक्याची लागवड केली. यामुळे यंदा विक्रमी मक्याचे उत्पादन झाले आहे. मका हमीभाव प्रतिक्विंटल 1850 रुपये दर केंद्र सरकारने जाहिर केला आहे. मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात मका आल्याने व्यापार्यांनी दर पाडले असून प्रति क्विंटल 1200 ते 1400 रुपये क्विंटल दराने मका खरेदी केली जात आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाने मका खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी शेतकर्यांमधून करण्यात आली. यामुळे राज्यात विविध ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. यासाठी शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
डिसेंबर महिन्यात मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी बंद करण्यात आली. अनेक शेतकर्यांकडे मका शिल्लक असल्याने केंद्र व राज्य शासनाने पुन्हा मका खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. यामुळे केंद्र शासनाने राज्य शासनाला 10 लाख क्विंटल मका खरेदी करावी असे आदेश दिले आहेत. मात्र राज्य शासनाने 5 लाख 10 हजार क्विंटल मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील 400 शेतकर्यांची 8 ते 10 हजार क्विंटल मका खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. मात्र शासनाने 5 ते 6 लाख क्विंटल मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यामुळे आणखी मका शिल्लक राहणार आहे. मका शिल्लक राहिल्याने शेतकर्याचे नुकसान होणार आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
