जनतेज न्युज

खासदार उदयनराजेंनी टोकाची भूमिका घेऊ नये..त्यांची समजूत काढणार – ना.शंभूराज देसाई

प्रतिनिधी , मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातुन खासदार उदयनराजे भोसले यांनी विष प्राशन करणार असल्याचे वक्तव्य केलं यावर बोलताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले…. उदयनराजेंनी असं वक्तव्य का केले आणि कोणत्या पार्श्वभूमीवरती केलं हे जरूर मी त्यांच्याशी बोलेन पण त्यांनी अशी टोकाची भूमिका घेऊ नये.. मराठा आरक्षण सर्वोच न्यायालयात टिकले पाहिजे यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी पाठपुरावा करत आहेत..मराठ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात व्यक्त केलं आहे..