प्रतिनिधी , कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. येत्या गुरुवारपर्यंत लावलेल्या निर्बंधाचे पालन करा. अन्यथा गुरुवारी पुन्हा होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करणाऱ्याचा निंर्णय घेणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिला आहे. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. हॉटेलसारख्या ज्या आस्थापनांवर मास्क काढावे लागतात त्या आस्थापना ३१ तारखेपर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
