प्रतिनिधी , भुसावळ ॲकर:-भुसावळ शहरामध्ये व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचे आकडा वाढत आहे भुसावळ तालुक्याचा करुणा बाधितांची रुग्ण संख्या चार हजाराच्या आसपास पोहोचली आहे तरीही शहरात प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही, शहरातील आठवडे बाजार सुरू आहे नगरपालिकेच्याआरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारची जबाबदारी जबाबदारी घेतलेली शहरामध्ये पाहावयास मिळत नाही पोलीस प्रशासनाने यावेळी मात्र थातूरमातूर कारवाई केली आहे व आता मात्र पोलिस प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलण्याची गरज असतानाही कारवाईमध्ये शीतलता दिसत आहे
भुसावळ लगतच्या चोपडा जामनेर याठिकाणी चार दिवसाचा कडकडीत लॉक डाऊन केलेला आहे या दोन्ही तालुक्यात रुग्ण संख्या कमी आहे
यावर बोलताना आमदार संजय सावकारे म्हणाले की जनतेने बंधने पाळणे गरजेचे आहे तरच कोवीडला आळा बसणार आहे अन्यथा रुग्ण संख्या वाढणार आहे जनतेने कोवीडची लस टोचून घेतली पाहिजे, जनतेने सहभाग नोंदवला पाहिजे जनतेवर ती बंधने घालून काही उपयोग होत नाही लोक काही ना काही कारण काढून बाहेर निघतात तरीही भुसावळ शहरांमध्ये लॉक डाऊन करण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत आमदार संजय सावकारे हे एन आर एच एम हॉस्पिटल उद्घाटन प्रसंगी पत्रकारशी बोलताना व्यक्त केले आहे
