प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे दिवशी(बु.) येथील पाच वर्षीय चिमुकलीवर नराधमाने
अनैसर्गीक कृत्यासह बलात्कार करुन अतिशय निर्दयीपणे तिचा निघृण हत्या करण्यात आली.या घटनेचा मन्नेरवारलू समाजासह विविध संघटनेच्या वतीने तिव्र निषेध करत बिलोली तालुका कडकडीत बंद पाळून तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.आंदोलनात विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर नराधमास आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्या प्रमाणे महाराष्ट्रात तयार केलेल्या शक्ती कायद्या प्रभाणे आरोपीला 21 दिवसाच्या आता फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांना देण्यात आले.मन्नेरवारलु समाज संघटनेचे अध्यक्ष नबाजी नलमेलवार, नगराध्यक्ष मारोती पटाईत,जि.प सदस्य लक्ष्मणराव , ठक्करवाड,शिवाजी पाटील पाचपिपळीकर , नागनाथ पाटील सावळीकर,भिमराव जेठे, बाबाराव रोकडे,
वलीयोदिन फारुखी, सुलेमान सेठ,विजय कुंचनवार, इंद्रजीत तुडमे ,साईनाथ गँगुलवार , गटनेता अनुप अंकोशकर ,लक्ष्मण शेट्टीवार , गणेश पानकर ,पवन ठक्करोड ,संदीप कटारे,शिवकन्या सुरकुटलावार
यांच्यासह परिसरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
