प्रतिनिधी , अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीने संगमनेर येथील नगरपालिका सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा अधिकारी यांनी दिले आहेत.व्यवसायिक दुकाने किंवा मंगल कार्यालयमध्ये विनामास्क आढळल्यास तात्काळ कारवाई करून एक महिनाभरासाठी सदर दुकाने किंवा मंगल कार्यालय सील करण्यात यावी असा फार्मन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढला आहे त्यामुळे आता नागरिकांनी कोविड्च्या नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी जास्त कोरोना रुंगण आढळून येतील त्याठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करून नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तूर्तास लॉकडाऊन नाही पण नाही नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे असे आव्हान जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पत्रकांराशी बोलताना केले आहे..!याप्रसंगी प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप यांसह पदधिकारी उपस्थित होते.
