प्रतिनिधी , सोलापूर : लापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील पर्यावरण प्रेमी युवकाने ‘जागतिक चिमणी दिना’चे औचित्य साधत “घर तिथे घरटे” या धोरणाने स्वतःच्या हाताने ५० स्पॅरोपार्क बनवून गावात मित्र परिवारास वाटप केली आहेत…
समेद शहा या युवकाचे स्पॅरोपार्क बनविण्याचे कार्य गेल्या १५ दिवसांपासून सुरू असून १०० हुन अधिक स्पॅरोपार्क बनवून वाटप करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाद्वारे ते चिमणी संवर्धनाचा संदेश देत आहेत.
