जनतेज न्युज

गावठी पिस्तुल आणि काडतुसे विकणाऱ्या लादेन टोळीला स्वारगेट पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी ,पुणे : गावठी पिस्तुल आणि काडतुसे विकणाऱ्या लादेन टोळीला स्वारगेट पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून ११ पिस्तुल आणि ३१ काडतुसे जप्त करण्यात आले. बारक्या उर्फ प्रमोद पारसे, राजू जाधव,बल्लूसिंग पारसे, लादेन उर्फ सोहेल मोदीन आसंगी, संदीप धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न करणारा स्वारगेट पीएमपीएल बसस्टॉपवर असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, कर्मचारी ज्ञाना बडे, मानिज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बारक्या उर्फ प्रमोदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्तुल आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने राजू जाधव याने १३ गावठी पिस्तुल बल्लूसिंग याच्याकडून आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राजुला ताब्यात घेऊन ५ पिस्तुल आणी १५ काडतुसे जप्त केली. त्याशिवाय बल्लूसिंग याच्याकडून १ पिस्तुल आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर लादेन उर्फ सोहेल याला ताब्यात घेऊन ३ पिस्तुल आणि ८ काडतुसे जप्त करण्यात आली. सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ११ पिस्तुल आणि ३१ काडतुसे जप्त करण्यात आली.