जनतेज न्युज

गृहमंत्री अनिल देशमुखांनी तातडीने राजीनामा द्यावा- चंद्रशेखर बावनकुळे

प्रतिनिधी , जालना- औरंगाबादमध्ये तरुणीवर कारमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जालन्यात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. जालना शहरातील संभाजी उद्यानाच्या समोर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केलेल्या घृणास्पद प्रकाराचा यावेळी जाहीर निषेध नोंदवन्यात आला. या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यां देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन परीसर दणाणून सोडला. राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी ही बावनकुळे यांनी केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला सरकारने वाचवण्याचा प्रयत्न चालवला असून ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून तीन महिन्यात या केसचा निकाल लावावा. अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आंदोलकांनी केली.
संजय राऊत यांनी ईडीकडे चौकशीसाठी 5 दिवसांची मुभा मागितली आहे. त्यावरुन बावनकुळे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांच्यावर देखील टीका केली आहे. जेव्हा राऊत यांच्यावर काही झालं की ते आगपाखड करतात. मात्र, दुसऱ्याच काही झालं तेव्हा ते मोठ-मोठे लेख लिहितात. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची भाषा न करता त्यांनी त्यांचे तोंड गप्प ठेवावे. राऊतांनी दुसऱ्यावर टीका करण्याआधी स्वतःचा आरसा तपासावा आणि त्यांच्यावर आलेल्या वेळेतून बोध घ्यावा असा देखील सल्ला त्यांनी दिलाय.