प्रतिनिधी , मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसंच आजच्या सामना अग्रलेखातून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केलेली आहे. राऊतांनी केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. भाजपनेही राऊतांना जशास तसं उत्तर दिलंय. ईडीची नोटीस आल्यानंतर राऊत बिथरलेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याची बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय.
