जनतेज न्युज

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येरवडा कारागृहाची पाहणी

प्रतिनिधी, पुणे- राज्यातील तुरुंगातील कैदयांची वाढती संख्या पाहता यापुढील काही दिवसात आधुनिक कारागृह बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अनिल देशमुख यांनी येरवडा कारागृहाची पाहणी करुन तिथल्या विविध गोष्टीची माहिती घेतली. राज्यातील कारागृहामध्ये कैदयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना मुलभुत सुविधा देण्यावर ताण येत आहे. त्यामुळे आधुनिक कारागृह करण्याबाबत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासमोर याबाबतचे सादरीकरण झाले असून त्यांनीही याला संमती दिली आहे. तसेच पोलिसांच्या घराबाबतही नव्याने घरबांधणी केली जाणार असून याबाबतही राज्य सरकार सकारात्मक असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.