प्रतिनिधी, मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रकार परिषद घेवुन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. “राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला असुन ७० ते ८० कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली”, असा थेट आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर केला. अतुल भातखळकर म्हणाले, “राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात घोटाळा झाला आहे. खोटी बिलं दाखवण्यात आली. राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. ७० ते ८० कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली. २०१० ते 30 नोव्हेंबर २०२० पर्यंतची ही बिलं आहेत, सगळी बिलं पास केली. या बिलांचं पेमेंट खोटं आहे. ही बिलं पास झाली नव्हती, आता पास कशी झाली? याची चौकशी करायला हवी. ज्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला, त्यांच्यावर कारवाई करा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
