प्रतिनिधी , औरंगाबाद : राष्ट्रवादी युवककाँग्रेस मेहबूब शेख यांच्या विरोधात वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने:
राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना बलात्कार प्रकरणात अटक न झाल्याने आज भाजप च्या वतीने औरंगाबाद येथील क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाल्याच पहायला मिळाली. शहरात दोन दिवसा पूर्वी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्कारा संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजुन पर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, यासाठी आज भारतीय जनता पार्टी च्या वतीने जोरदार घोषणा बाजी करत आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थीत क्रांती चौक येथे करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनील देशमुख यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्या मध्ये पुतळा जाळण्यावरुन झटापट झाल्याच पहायला मिळाली. यावेळी उपस्थीत आंदोलकांनी मोठ मोठ्याने घोषणा बाजी करत ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा दिल्या. यावेळी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर, जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, जालिंदर शेंडगे, माधुरी आदवंत, महिला अध्यक्ष अमृता पालोदकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर भाजप आणि भाजपच्या विविध आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते.
