जनतेज न्युज

गॅस दरवाढीमुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास महिलांचे प्राधान्य, येणाऱ्या अर्थसंकल्पात गॅस दरवाढीबाबत गंभीर विचार करावा.

प्रतिनिधी , धुळे : ग्रामीण भागातील महिलांची धुरापासून मुक्ती व्हावी यासाठी शासनाने मोफत गॅस कनेक्शन दिले, पण गॅस दरवाढीमुळे ते घेणे शक्य नसल्याने गॅस ऐवजी पारंपरिक चुलीवरच स्वयंपाक करण्यास ग्रामीण भागातील महिला प्राधान्य देत आहे.
धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज ही चुलीवरच्या स्वयंपाकला प्राधान्य दिले जात आहे, शासनाने जरी गॅस ग्रामीण भागात मोफत दिले असले तरी गॅस चे दरवाढीमुळे ग्रामीण भागातील काही नागरिकांना ते घेणे शक्य नाही, ग्रामीण भागातील महिला पुरुष हे हातमजुरी व शेती कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह करत असतात, त्या मध्ये आपल्या मुलांचा शिक्षणनाचा खर्च व घरातील खर्च त्या मुळे गॅस न घेता चुलीवरच आज पण ग्रामीण भागातील महिला स्वयंपाक करताना दिसर आहे. त्यामुळे सदर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्य चे लक्ष लागून आहे. यावेळी देखील थोड फार का होईना मोदी सरकार दिलासा देईल अशी असा व्यक्त करण्यात येत आहे.