प्रतिनिधी , सांगली : सांगली वाहतुकीचे नियम पाळा आणि स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्या,असा संदेश “राजा राणीची गं जोडी”या टीव्ही मालिका फेम मानिराज पवार आणि शिवानी सोनार यांनी दिला आहे.सांगली मध्ये ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी उपस्थिती लावली होती,यावेळी या दोन्ही कलाकारांनी शहरात दुचाकीवरून फेरफटका मारत वाहतुकीचे नियम पाळण्याची आवाहन केले.
सांगली पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यात १८ जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत 32 रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले आहे.या अंतर्गत सांगली वाहतूक शाखेकडून आज सांगली शहरांमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमासाठी”राजा राणीची गं जोडी”या टीव्ही मालिकेतील कलाकार मानिराज पवार आणि सोनाली पवार यांनी विशेष उपस्थित लावली होती.अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडलेल्या या समारंभामध्ये वाहतूक नियम पाळण्या बाबत जागृती करत हेल्मेट वापरून वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनधारकांचा पुष्प गुच्छ देऊन कलाकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच रिक्षा चालकांना यावेळी वाहतूक नियमांचे पोस्टरही वाटप करण्यात आले,यावेळी दोन्ही कलाकारांनी बोलताना नागरिकांनी वाहन चालवताना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या दृष्टीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,आणि ते करावं असं,आवाहन केलं. त्यानंतर दोन्ही कलाकार व सांगली पोलीस दलाने सांगली शहरातून दुचाकी वाहनावरून फेरफटका मारत वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला.तसेच सांगली पोलीस दलाच्यावतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहांतर्गत वाहतुकीच्या नियमांचे बाबत सामाजिक संदेश देणारे रांगोळी यावेळी काढण्यात आली होती.
