जनतेज न्युज

गेली अडीच वर्षापासून नांदेडचा विकास हा थांबला होता – खा. प्रताप पाटील चिखलीकर

प्रतिनिधी, नांदेड : आज भारतीय जनता पार्टी जिल्हा नांदेड च्या वतीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खासदार चिखलीकर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले गेली अडीच वर्षापासून नांदेडचा विकास हा थांबला होता पण देवेंद्रजी फडणवीस सरकारमध्ये नांदेडच्या विकासाला गती मिळणार आहे व निश्चितच नांदेड जिल्ह्याचे चित्र वेगळे राहील असे ते म्हणाले.