जनतेज न्युज

ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी कर्मचारी बुथवर रवाना

प्रतिनिधि , हिंगोली : संपूर्ण महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यातही उद्या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. आज सकाळ पासून बूथवर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. उद्या प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने गावा गावातील मतदान बुथवर कर्मचारी मतदान यंत्र व साहित्यासह रवाना झाले आहेत. यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही संवेदनशील निवडणूक असते, त्यामुळे यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सर्व खबरदारी घेतली असल्याच प्रशासनाकडुन सांगण्यात येत आहे.