जनतेज न्युज

नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत मतदान साहित्य वाटप

प्रतिनिधि , नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान साहित्य, यंत्रांचे वाटप करण्यात आले. या मतदान प्रक्रियेसाठी तबल ३५० हुन अधिक अधिकारी, तर ९ हजाराहुन अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास ५१२० मतदान केंद्र असुन ह्याच मतदान केंद्राच्या माध्यमातून एकूण १२ लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ४४ केंद्र हे संवेदनशील असुन या संपुर्ण मतदान प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.