जनतेज न्युज

ग्रामपंचायत निवडणूक :हिंगोलीत वंचितनेही खाते खोलले तब्बल दहा ग्रामपंचायतीवर झेंडा

प्रतिनिधि , हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका वंचित बहुजन आघाडीने देखील प्रथमच आपले खाते खोलले आहे. या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये चांगली कामगिरी करत वंचित बहुजन आघाडी ने तब्बल दहा ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये दोनशेहून अधिक सदस्य वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत पॅनलचे निवडून आले आहेत. या चांगल्या कामगिरीमुळे निश्चितच आता वंचित बहुजन आघाडी येत्या नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आणखी चांगली कामगिरी करेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे महासचिव रवींद्र वाढे यांनी व्यक्त केला आहे.