प्रतिनिधि , लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हैबतपुर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला काही व्यक्तींनी पैशाच्या कारणावरून गत 4 दिवसांपूर्वी मारहाण केली होती. सदरच्या मारहाणीमध्ये एक जखमी झालेल्या व्यक्तीला उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारा करत असताना त्याचा आज मृत्यू झाला मृत्यूनंतर संबंधित मृत व्यक्तीच्या परिवारातील व्यक्तींनी मृतदेह घेऊन उदगीर शहर पोलिस ठाण्यात ठिय्या घातला होता. याच दरम्यान जमलेल्या जमावाने रस्त्याने जात असलेल्या वाहनावर दगडफेक करून अनेक वाहनांचे नुकसान केलं तात्काळ उदगीर पोलिसांनी ॲक्शन घेऊन संबंधित घटनेची व्यवस्थित हाताळणी करण्याचा प्रयत्न केला यात उदगीर शहरातील एक व्यक्ती ही जखमी झाला आहे. लातूर येथून अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून जनतेला कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन त्यांच्या कडून करण्यात आला आहे. उदगीर शहरात काही काळासाठी तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
