प्रतिनिधी , जालना : शहरात चोऱ्याचे प्रमाणात वाढ झाली आहे .गेल्या दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथिल ऐका खाजगीकार्यालयत चोरट्यानी फोडले होते.त्याचा तपास सदर बाजार पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी तब्बल 9 तासातच त्याचा छडा लावला आहे. दि.4 फेब्रुवारी रोजी पॉवरग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडीया लिमीटेड या कंपणीचे संभाजी नगर येथील कार्यालय हे अज्ञात आरोपीतानी दि.3 फेब्रुवारी रोजीचे रात्री कोणीतरी अज्ञात आरोपीतानी कार्यालयाचे कडी कोंडा कटावणीचे साहयाने तोडुन कार्यालयातील डिजीटल सोनी कंपणीचे कॅमेरे , निकॉन कंपणीच्या दुर्बीण एच.पि.कंपणीचे संगणक संच, ड्रीलींग मौशन असे एकुण 2 लाख 19 हजार 200 रुपयेचे साहीत्य रात्रीचे वेळी चोरुन नेले होते.
पोलीस अधिक्षक यांनी घडणारे गुन्हया बाबत विशेष लक्ष घालुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यावरुन संजय देशमुख, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सदर बाजार जालना यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उधडकीस आणण्याचे दृष्टीने सर्व स्टॉफला सुचना देऊन गुन्हयातील आरोपी शोध घेणे साठी आपापले खबरी यांना कार्यान्वीत करुन गुन्हयाची माहीती काढण्याच्या सुचना दिल्या होत्या. तपास पथक प्रमुख श्रीमती मंजुषा सानप व स्टॉफचे कर्मचारी यांनी पायी फिरुन बस स्थानक , लक्कडकोट , संभाजी नगर परीसरात गोपणीय खबऱ्या मार्फत माहीती काढत असताना मिळालेल्या माहौती आधारे आरोपी नामे शेख हबीब शेख युसुफ वय 19 वर्षे रा. लक्कड कोट, जालना ,सय्यद शौकत सय्यद महेमुद वय 28 वर्षे रा. भरत नगर, नवीन मोंढा मागे जालना यांना ताब्यात घेऊन त्यांचे कड़े तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.
